एकादशीसाठी पंढरपूर सजली

0

पंढरपूर । येत्या मंगळवारी (दि.4) आषाढी एकादशी असल्याने माऊली भक्तांचा ओघ पंढरपूरकडे वाहत असून भक्तगणांच्या सेवेसाठी आणि एकंदरीतच आषाढी एकादशी सोहळ्यासाठी अवघी पंढरी नगरी सज्ज झाली आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून निघालेल्या दिंड्या आणि पालख्या पंढरपूरच्या वेशीवर येऊन पोहचल्या असून आज उशीरापर्यंत आणखी वारकरी, भक्त पंढरीत दखल होतील… आता या सार्‍यांना आस आहे ती श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाची.

यावर्षी प्रथमच मंदिरावर विद्युत रोषणाई
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरावर यावर्षी प्रथमच मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे. सप्त रंगाच्या लाईटच्या माळा मंदिराच्या चोहोबाजूंनी आकर्षक पद्धतीने लावली असून रंगीबेरंगी रोषणाईत मंदिराचे शिखरही झगमगते आहे. शिवाय नामदेव पायरीचे महाद्वार, दर्शन मंडप, तुकाराम भवन या सगळ्या मंदिर समितीच्या वास्तू रात्रीच्या अंधारात उजळून निघाल्या आहेत.