एकास भांडणावरुन मारहाण

0

जळगाव । कानळदा येथे अजय नथ्थु सोनवणे यांच्याशी गुरूवार 23 रोजी दुपारी भांडण झाले होते. या भांडणाचे कारण करून सायंकाळी 7 वाजता प्रविण ज्ञानेश्वर सपकाळे, ज्ञानेश्वर तुकाराम सपकाळे, राजेंद्र रमेश सपकाळे, कुलदिप आत्मराम सोनवणे यांनी अजय सोनवणे यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत अजय याच्या डोळ्याखाली जखम झाली आहे.

अजयच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला सर्वांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.