औरंगाबाद । औरंगाबादेमध्ये नशेच्या गोळ्यांचा व्यापार करणार्या एका व्यक्तीला पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन अटक केली परंतु, आता या आरोपीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर औरंगाबादमधील निम्मे पोलीस स्टेशन क्वारंटाईन करावे लागले आहे.
या आरोपीच्या संपर्कात तब्बल 38 अधिकारी आणि कर्मचारी आले आहेत. तसेच तीन खासगी व्यक्तींसह एक फोटोग्राफरही या व्यक्तीच्या संपर्कात आला आहे. या सर्वांच्या स्वॅब टेस्ट घेण्यात येणार आहे. संबंधित पोलीस स्टेशनच्या 38 पोलिसांपैकी 30 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.