एका किसिंग सीनने आयुष्यात वादळ आणल होतं – आयुष्मान खुराणा

0

मुंबई : आयुष्यमानने ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. मात्र, आता आयुष्यमान खुराणा सध्या एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. सुरुवातीच्या काळात आयुष्यमानला भरपूर स्ट्रगल करावे लागले होते. महत्त्वाचं म्हणजे या संघर्षादरम्यान आयुष्यमानच्या पत्नी ताहिरानेच त्याची साथ सोडली होती. कारण होते यामी गौतमसोबतचा किसिंग सीन.

पहिल्याच चित्रपटात आयुष्यमानचे यामीसोबत काही किसिंग सीन होते. या सीनमुळे तब्बल ३ वर्षे ताहिराने आयुष्यमानची साथ सोडली होती. हे तीन वर्षे आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असल्याचे आयुष्यमानने एका मुलाखतीत म्हटले आहे.

आयुष्यमानच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासोबतच बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार कमाई केली होती. मात्र, या चित्रपटातील एका सीनने आपल्या आयुष्यात वादळ आणल होतं आणि यामुळे आमच्या संसारात ३ वर्षे तणाव निर्माण झाल्याचे आयुष्यमानने सांगितले.