२४ तासात दुसरी घटना, ट्रकच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू

जळगाव – जळगाव एका दिवसात दुसरी घटना, ट्रकच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू। जळगावहून ममुराबादकडे जाणार्‍या मोटारसायकलला मागून वेगाने जाणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलवरील मायलेकाचा मृत्यू झाला. ही घटना अरुणामाई फार्मसी कॉलेजजवळ घडली.
आसोदा येथील रहिवासी दिलीप अभिमन कोळी व त्यांची आई अलकाबाई अभिमन कोळी हे मोटारसायकल (क्र.एमएच 19 डीसी 6687) ने 12 जून रोजी जळगावला आले होते. ते काम आटोपून रविवारी सकाळी 10 वाजता जळगाव-ममुराबाद रस्त्याने मोटारसायकलने जात होते. मागून वेगाने येणारा ट्रक (क्र.एमएची 19 सीवाय 5473) ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात आई व मुलगा गंभीर जखमी झाले. ट्रकचालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत कळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल केले. औषधोपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. यासंदर्भात विनोद कोळी यांनी फिर्याद दिली. त्यावरुन ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.