अलिबाग : रायगड जिल्ह्यातील 28 पोलिस ठाणे अंतर्गत बेकायदा वाहने चालवून नियम उल्लंघण करणार्या् 242 जाणांवर रायगडच्या पोलिसांनी कारवाई करीत 87 हाजाराचा दंड वसूल केला आहे. मुंबई गोवा महामार्ग आणि मुंबई एक्सप्रेस वे वरील बेदारकपणे वाहन चालकांमुळे अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शनिवारी 3 अपघातांची नोंद झाली असून मुंबई गोवा महामार्वरील आंबवली फाटा येथे ट्रेलर अचानक बंद पडल्याने वाहतुक कोंडी झाली. यावेळी अज्ञाताने ड्रायव्हरला धक्काबुक्की करीत सुरीचा धाक दाखवित 5000 रुपये लुटले. याप्रकरणी दादर सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.वाढते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी बेदारकारक वाहन चालकांविरोधात मोहीम हाती घेतली असून बुधवारच्या कारवाईत 87 हाजाराचा दंड वसूल केला. तर गेल्या दिड महिन्याच्या कारवाईत जवळ पास 15 लाखांचा दंड वसूल केला आहे. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर केलेल्या कारवाईत 35 लाखापेक्षा जास्त दंड वसूल केला.