वॉशिंग्टन । आपल्या भाषणांमुळे सर्वांनाच भुरळ घालणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे युवा वर्गात चांगलेच प्रसिद्ध आहेत. आजही त्यांना भाषणासाठी बोलावण्यासाठी पहिली पसंती असते. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एका भाषणासाठी ओबामा यांचे मानधन किती असावे? पण जर तुम्ही त्यांच्या मानधनाचा आकडा ऐकाल तर तुम्हाला चांगलाच घाम फुटेल.
एका भाषणाचे ओबामा तब्बल दोन कोटींपेक्षाही अधिक रुपये घेतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवर सार्वजनिक भाषण दिले होते. तेव्हा त्यांनी त्या भाषणासाठी 4 लाख अमरिकी डॉलर घेतले होते. ओबामांनी त्यांच्या या संभाषण कलेचा उपयोग उत्पन्न कमावण्यासाठी केल्याने त्यांच्यावर टीकादेखील झाली. मात्र, याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. गुरुवारी ओबामांनी आणखी एका कार्यक्रमात भाषण दिले. अॅडव्हर्टायझिंगच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी इतकेच पैसे घेतले. या पैशामध्ये त्यांची 90 मिनिटांची मुलाखत घेण्यात आली. या एका मुलाखतीसाठी त्यांना दोन कोटींपेक्षा अधिक रुपये द्यावे लागले. गुरुवारी झालेले भाषण लोकांना विशेष आवडले. या भाषणात अनेकदा त्यांनी टाळ्या घेतल्या. हा कार्यक्रम हिस्ट्री चॅनलने आयोजित केला होता.