एका महिन्यात 20 कोटी हायड्रोक्झिक्लोरीक्वीनच्या गोळ्यांचे उत्पादन: मुबलक साठा उपलब्ध

0

नवी दिल्ली: सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यावर अद्याप तरी कोणतीही विशेष लस किंवा औषध नाही. मात्र मलेरियावरील हायड्रोक्झिक्लोरीक्वीन ही गोळी सध्या तरी कोरोनासाठी उपयुक्त ठरत आहे. या गोळीला जगभरातून मागणी होत आहे. भारतात या गोळीचे मुबलक प्रमाणात उत्पादन होत आहे. सध्या एका महिन्यात 20 कोटी हायड्रोक्लोरीक्वीनच्या गोळया उत्पादीत केल्या जात असून भारतासाठी हा साठा मुबलक आहे. परदेशातून मागणी झाल्यास ती देखील पूर्ण होईल असा विश्वास zydus cadila या औषध निर्मिती कंपनीचे सीईओ पंकज पटेल यांनी दाखवला आहे.

हायड्रोक्झिक्लोरीक्वीन गोळ्यांची मागणी अमेरिकीकेने केली होती. भारताने अमेरिकीकेला याचा पुरवठा केला. त्यानंतर इतर देशांनी देखील त्याची मागणी केली होती. भारताचा याबद्दल जगभर कौतुक देखील होत आहे.