कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षी वृक्षारोपणावर लाखो रुपये खर्च करण्यात येतात. मात्र वृक्षांच्या देखभाल दुरुस्तीकडे दूर्लक्ष केले जात असल्याने लाखो रुपये खर्च पाण्यात जात आहे. पालिकेने वर्षभरात रोपे वाटप व लागवडीवर लाखो रुपये खर्च केले आहेत. वृक्ष प्राधिकरणाच्या मंजुरीने दोन वर्षात अनेक करणांसाठी ३०० झाडे तोडली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मात्र ही झाडे तोडली मात्र त्याबदल्यात झाडेही लावण्यात आलेली नाहीत.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे क्षेत्रफळ ६७.६५ चौ.मी इतके मोठ आहे. याठिकाणी मोठया प्रमाणावर इमारती तसेच विकासकामे होत आहेत. मात्र शहरीकरणाच्या नावाखाली येथे मोठया प्रमाणावर झाडांची कत्तले केली जातात. काही ठिकाणह परवानगी घेऊन तर काही ठिकाणी अनधिकृतरीत्या सर्रास झाडांची कत्तले होतात. एखाद झाड तोडल्यास त्याठिकाणी पाच झाडे लावणे बंधनकारक आहे. मात्र त्याची खातरजमा केली जाते की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. एकिकडे पर्यावरण दिनाच्या दिवशी वृक्ष दिंडी काढली जाते आणि यामधुन झाडे लावा झाडे जगवा असा संदेशही दिला जातो. मात्र तसे प्रत्यक्षात काही पाहावयास मिळत नाही. शहरात रस्त्याच्या कडेला झाडे लावुन त्यांना संरक्षण जाळी बसविण्यात येतात. मात्र अनेक संरक्षण जाळयांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. अनेक जाळया तुटलेल्या अवस्थेत आहेत. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या सुमारे १५ लाख इतकी असून लोकसंख्येच्या प्रमाणात पालिका क्षेत्रात ७५ लाख झाडाची गरज आहे. अवघी अडीच ते तीन लाख झाडे असून हा गंभीर बाब असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
कल्याण डोंबिवलीत रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरु आहेत. तसेच अनेक विकास कामे सुरु आहेत. ;यामध्ये अडथळा येणारी झाडे तोडली आहेत. मात्र त्याजागी झाडे लावण्याचे काम सुरु आहेत
संजय जाधव, केडीएमसी, उदयान अधिक्षक