रांची । बॉलिवूडचे स्टारसाठी पाठलाग करण्यात येतो किवा त्याच्या घरासमोर चाहते उभे राहतात. मात्र पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासाठी त्याचे चाहते कारपुढे झोपून जावून वाट अडवत असत. असे किस्से सांगितले जातात. त्यानंतर भारतीय संघाचा वन-डे संघाचा कर्णधार माही उर्फ महेंद्रसिंग धोनी याच्यासाठी ही चाहते असा काहीचा प्रकार करतात असे दिसून आले.रांची एअरपोर्टवर धोनीचा पाठलाग करित एक तरूण थेट माहिच्या आलिशान हमर कारपुढेच उभी राहिली आणि पुढे काय झाले ते ‘कॅप्टन कूल’ च्या प्रतिमेला साजेसेच होते.
एका सेल्फीसाठी धडपड
माही उर्फ महेंद्रसिंग धोनी हा कोलकात्याला विजय हजारे ट्रॉफीतील सामन्यासाठी गेला होता. तिथून तो झारखंड संघासोबतच रांचीत पोहोचला. त्यावेळी बिसरा मुंडा एअरपोर्टवर एका तरुणीने त्याला पाहिले आणि त्याचा पाठलाग सुरू केला. धोनीच्या स्वागतासाठी त्याची हमर कार विमानतळाबाहेर उभी होतीच. त्यात बसून धोनी निघाल्याचे पाहून ही तरुणी सुरक्षा भेदून थेट त्याच्या कारसमोरच आली. धोनीचा ऑटोग्राफ मिळावा किंवा त्याच्यासोबत सेल्फी काढता यावा, यासाठी ती धडपडत होती. पण, एअरपोर्टवरची गर्दी पाहता, धोनीला कारमधून खाली उतरणे शक्यच नव्हते.
‘ओके’ असल्याची विचारपूस करुन पुढे गेला
तरुणीने धोनीची कार अडवल्याने गोंधळ वाढू नये, म्हणून पोलीस पुढे सरसावले आणि तिला कारसमोरून बाजूला खेचले. त्यावेळी तिची हँडबॅग खाली पडली आणि ती हमरच्या चाकाखाली आली. हे कळताच, पुढे गेलेल्या धोनीने कारचे दार थोडेसे उघडून मागे वळून पाहिले. सगळे ’ओके’ आहे ना, अशी विचारपूस करूनच तो पुढे गेला. आपल्या चाहत्यांबद्दल धोनीला वाटणारे प्रेम, आस्था त्या छोट्या कृतीतून सगळ्यांनाच जाणवली.