वॉशिंग्टन – भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान सरकारने फाशीची शिक्षा सुनावाली आहे. कुलभूषण हे रॉचे हेेर असल्याचा दावा पाकने केला आहे. मात्र यावर भारताने आक्षेप घेतला आहे. आता याला अमेरिकातील वरिष्ठ विश्लेषकांनीही दुजोरा दिला आहे. कारण त्यांनीही पाकिस्तानने कुलभूषण प्रकरणी रचलेली कहाणी आहे, असे सांगत पाकच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एकीकडे, पाकिस्तानने भारताचे कुलभूषण यांना खोटे पुरावे तयार करून फाशीची शिक्षा सुनावत असतांना काल रात्री उशिरा भारतीय मच्छीमारांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून पाकच्या सैनिकांचे जीव बचवून त्यांना जीवदान दिले आहे.
पाकिस्तान आता या प्रकरणात जागतिक पातळीवर एकाकी पडत चालला आहे, असे अमेरिकेच्या विश्लेषकांनी नमूद केले आहे. जाधव यांना पाकिस्तानने आर्मी अॅक्टअंतर्गत शिक्षा सुनावली आहे. भारताने वारंवार मनाई करूनही सर्व मूलभूत नियम आणि कायद्यांना धाब्यावर बसवत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर ठरवले आणि त्यांच्यावर दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्याचा आरोप लावत शिक्षा सुनावली. जाधव यांच्या शिक्षेवर स्वत: पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी शिक्कामोर्तब केले आहे. आता या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटू लागली आहे.
जाधव यांना त्यांचा कायदेशीर बचाव करण्यासाठी वकीलही देण्यात आलेला नाही. अशा प्रकारे हा तपास एक रहस्य बनवण्यात आला आहे. मला याचे आश्चर्य वाटते की जाधव प्रकरणात पाकने जितकी घाई केली, तितकी मुंबई हल्ल्यात सामील असल्याचा आरोप झालेल्या दहशतवाद्यांवर खटला चालवण्याची घाई का केली नाही. मुंबई हल्ल्याचा खटला गेली 9 वर्षे सातत्याने टोलवला जातो आहे. अलयसा एर्ज, अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंट ऑफिशिअलमधील दक्षिण आणि केंद्रीय आशिया ब्युरोचे माजी अधिकारी व सध्या परराष्ट्र व्यवहार काउन्सिलमध्ये भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आशियाचे वरिष्ठ सदस्य.
जाधव यांना सुनावल्या गेलेल्या शिक्षेला आधारभूत म्हणून ज्या पुराव्यांचा हवाला दिला जात आहे, ते खूप कमकुवत आहेत. जाधव यांच्याविरोधात कोणते पुरावे समोर ठेवल्याशिवाय त्यांना दोषी ठरवून शिक्षा देणे हे राजकीय इच्छेने प्रेरित आहे. पाकिस्तान दहशतवादाविरोधात लढण्याचा गांभीर्याने प्रयत्न करत नाही, असा भारताचा आरोप आहे. याच आधारे भारत नेहमी कुटनीतीच्या आधारे पाकिस्तानला एकटे पाडण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांना उत्तर म्हणून पाकिस्तानने जाधव यांना शिक्षा सुनावली आहे.
भारत गोपालस्वामी, संचालक, अटलांटिक काउन्सिलच्या दक्षिण आशिया सेंटर
पाकिस्तानने जाधव यांच्या अवतीभोवती बनवलेली कहाणी रहस्यमय आणि अनिश्चिततेने भरलेली आहे. पाकिस्तान भारताला कठोर संदेश देऊ इच्छित आहे, हे स्पष्टच आहे. – मायकल कुगेलमन, संचालक, वुड्रो विल्सन सेंटरच्या दक्षिण आशिया विभाग आणि सिनियर असोसिएट दरम्यान एका बाजुला पाकिस्तान भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांच्यावर हेर असल्याचा खोटा आरोप लावून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावत असतांना त्याचवेळी दुसरीकडे भारतीय मच्छीमारांना पाकच्या बुडत असलेल्या सैन्यांना वाचवल्याची घटना घडली आहे. संकटसमयी मदतीला धावून जाण्याच्या भारतीय संस्कृतीला अनुसरून, आपल्या काही मच्छिमारानी दोन पाकिस्तानी नौसैनिकांचा जीव वाचवल्याची घटना अरबी समुद्रात गुजरातजवळ घडली आहे. पाक सैन्यांनी भारतीय मच्छिमारांना बळजबरीने ताब्यात घेतले होते. त्यांनतर ते कराचीला घेऊन जात असतांना बोट भारत-पाक सीमेवर उभ्या असलेल्या एका भारतीय बोटीला धडकली आणि पाण्यात बुडू लागली. त्यावेळी प्रसंगावधान राखून भारतीय मच्छिमारांनी पाकच्या दोन नौसैनिकांना वाचवलं. या अपघातात पाकचे तीन सैनिक बुडाले. भारतीय तटरक्षक दलाने या तिघांचे मृतदेह पाककडे सोपवले आहेत.