चिंबळी : कार्यकर्त्यांनी गावात नेहमी एकजुट करून एकोपा ठेवला पाहिजे, तरच विकास करता येतो. त्यासाठी नेहमी समाजात राहून समाजकार्य केले पाहिजे, असे मत माजी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केले. अधिकमास समाप्तीनिमित्त हनुमान मंदिरात एकदिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काकडी आरती, महाप्रसाद, हरिपाठ, संगीत भजन, ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांचे कीर्तन, गावातील नवविवाहीतांचा सत्कार, महिला भजीनी मंडळाच्या महिलांचा सत्कार मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक विलास कातोरे यांचा ह.भ.प.शेवाळेमहाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ, ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अर्जुन अवघडले, रामचंद्र कातोरे, माजी चेअरमन ज्ञानेश्वर कड, हेमंत जैद, संतोश कातोरे, चेअरमन बाबासाहेब बर्गे, अप्पा लोखंडे, श्रीरंग बनकर, शिवाजी कड, ह.भ.प.साखरचंद लोखंडे, सत्यवान जैद, राजेंद्र जैद, पंडित कड, भगवान साकोरे, शहाजी करपे, तुकाराम गवारे, पत्रकार सुनील बटवाल, श्रीकांत बोरावके, वसंत फलके, कुंडलिक बनकर, दादासाहेब जैद, सविता कातोरे, अर्जुन जाधव, हिरामण गवळी, सत्यवान बर्गे, छबू खंडागळे, आशा बहिरट, वृषाली विधाते, सुशिला जाधव, निर्मला लोखंडे, संगित जाधव, शोभा जाधव आदी उपस्थित होते.
एकत्रित राहून विकास करा
मोहिते पुढे म्हणाले की, या भागात गेल्या दहा वर्षांपुर्वीपासुन औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढली असुन विकासाची कामे ही भरपूर झाली आहेत. पुढील काळातही राहिलेली विकासकामे होणार आहेत. जो माणूस आपल्या गावात नेहमी विकास करत आला आह, त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा. आपल्याला कुठल्याही प्रकारची उणीव भासवून देणार नाही. आपण अधिक मासानिमित्त पुरणपोळीचा महाप्रसाद करून सर्व नवविवाहितांचा जावई पाहुण्यांचा सत्कार केला. हे मोठे भाग्याचं काम केले. असंच पुढे ही समाजकार्य करा, मी तुमच्या नेहमी पाठीशी खंबीरपणे उभा राहिन. गावातील राजकारण व हेवेदेवे बाजूला ठेवून एकत्रीत राहून गावाचा विकास करून समाजकार्य करा. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले होते.