एक्झिट पोलच्या धसक्याने मध्य प्रदेशात भाजपच्या हालचाली वाढल्या; अपक्षांची घेतली भेट

0

भोपाळ-मध्यप्रदेश विधानसभेसाठी मतदान झाले आहे. याठिकाणी भाजप व कॉंग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. दरम्यान काही वृत्तवाहिन्याचे एक्झिट पोल समोर आले आहे, त्यामुळे भाजपची हालचाली वाढली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्वपूर्ण बैठक घेतली आहे.

पक्षाच्या नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेत चौथ्यांदा भाजप सत्तेत येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सोबतच त्यांनी अपक्ष उमेदवारांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.