गुंटूर: देशात कालच लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे पार पडले असून, येत्या २३ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहिर होणार आहे. लोकसभेचे निकाल लागण्यापूर्वी देशात एक्झिट पोल मध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येईल असे दिसत आहे. या एक्झिट पोलच्या निकालावर भाजपाचे जेष्ठ नेते, तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरू शकतात असे भाकीत केले आहे. काल ते गुंटूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
१९९९ पासून देशात एक्झिट पोलचे आकडे चुकीचे ठरत असून, त्यांच्या या अंदाजाला अंतिम निकाल म्हणता येणार नाही, असेहि ते म्हणाले. काल झालेल्या निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले त्या निकालानंतर सगळ्यांनी नायडू यांचे अभिनंदन केले असता त्यांनी हे विधान केले आहे. प्रत्येक पक्षाला आपणच जिंकू असे वाटत असते. २३ में ला येणारे निकाल वेगळे असू शकतात. त्यामुळे येणारा निकाल हा एक्झिट पोल प्रमाणे लागेल हे मानणे चुकीचे आहे असे ते म्हणाले. देशात कुणाची सत्ता येईल हे मला माहित नाही, पण आज देशाला एका स्थिर सरकारची गरज आणि चांगल्या नेत्याची गरज आहे असेही ते म्हणाले.