एक्सप्रेसच्या धडकेत दोन चिमुकल्यासंह महिलेचा मृत्यू

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेसच्या धडकेत दोन चिमुकल्याचा व एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिलेचे वय 25 तर मुलगा व मुलीचे वय अंदाजे 7 ते 9 वर्ष आहे. अद्याप या मृत महिलेची व मुलांची ओळख पटलेली नाही.

रूळ ओलांडतान अंदाज चूकला आणि…
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला लोणावळ्यावरून पुण्याला जाणार्‍या लोकलमधून उतरली. यावेळी लोकलच्या पाठीमागून रुळ ओलांडणार्‍या महिलेला व मुलांना लोणावळ्याच्या दिशेने जाणार्‍या कोयना एक्सप्रेसचा अंदाज आला नाही. एक्सप्रेसच्या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना म्हणजे कल्याण येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्तीच होती. कल्याणमध्ये काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. ज्यामध्ये निगडी येथे राहणार्‍या तीन मायलेकींचा लोकलमधून उतरल्यानंतर रुळ ओलांडण्याच्या घाईत मृत्यू झाला होता.

पाच दिवसात सहाजणांनी गमावला जीव
पिंपरी रेल्वे स्थानावर घडलेली ही पहिलीच घटना नाही. 7 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत एका अंपगासह सहाजणांनी रुळ ओलांडताना जीव गमावला आहे. त्यामुळे नारिकांनी रुळ ओलांडण्याची घाई न करता जीन्याचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.