एक्साईज्च्या नावाखाली सरकारी लूट

0

मुंबई । 2014 च्या लोकसभा निवडणूकीत प्रचाराच्या वेळी मोदीजींनी नर्मदा धरणाची उंची वाढवण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, हे काम पूर्ण झाल्यावर 400 करोड रूपयांची वीज महाराष्ट्राला पुरवली जाईल असेही आश्वासन त्यांनी दिले होते. आता या धरणाचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात आजही लोडशेडिंग आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या वचनांकडे लक्ष द्यावे आणि महाराष्ट्राच्या वाट्याची वीज राज्यात आणावी, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

पंतप्रधानांना निवेदन द्यावे
शिवसेना पेट्रोल, डिझेलच्य वाढत्या दरांविरोधात नवरात्रीदरम्यान आंदोलन करणार असल्याचे कळले. शिवसेना नक्की केंद्रात आणि राज्यात सरकारमध्ये सहभागी आहे का, हेच कळत नाही. एक्साईसच्या नावाखाली सरकारने चालवलेल्या लूटीला केंद्रात व वॅट सारखे सरचार्ज आकारून लूट करणार्‍या राज्य सरकारला सेना कॅबिनेटमध्ये विरोध करणार आहे की नाही? केंद्रातील त्यांच्या मंत्र्याने या विरोधात कॅबिनेटमध्ये बोलावे, पंतप्रधानांना लिखित स्वरूपात निवेदन द्यावे, राज्यात यांचे नऊ मंत्री असताना त्यांनीही कॅबिनेटमध्ये या विरोधात आवाज उठवणे अपेक्षित आहे. सरकारमध्ये मौन धारण करून बसायचं आणि जनतेसमोर आंदोलनाची भाषा करायची ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. महाराष्ट्रातील जनता हे कधीही स्वीकारणार नसल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.