मुंबई । मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळील पुलावर आज दुपारी 12 वाजता खासगी ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला. या अपघातात चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर 30 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. श्री सिद्धेश्वर ट्रॅव्हल्सची ही बस होती.
लोणावळ्याजवळच्या पुलावर खासगी ट्रॅव्हल्सची बस उलटून हा अपघात झाला. या अपघातात चार वर्षांची एक मुलगी ठार झाली, तर 54 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी 30 प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींमध्ये 8 ते 10 वर्षांच्या चार-पाच मुलांचा समावेश आहे. जखमींवर निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बस मुंबईहून सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जाणार होती.