एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात 3 ठार

0

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास कार आणि टेम्पोची धडक झाली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.

तर दोन जण जखमी झाले आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.