येरवडा । संपूर्ण जगामध्ये प्रदूषणाचा वाढता धोका व पुणे शहरातील स्वच्छतेबाबतची समस्या याबाबतच्या जनजागृती मोहीम व ‘एक कदम समाजसेवा कि ओर’ हा उपक्रम श्री संत तुकाराम माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता 9 वीमधील विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.11) चंदननगर परिसरात राबविण्यात आला. नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका संजिला पठारे यांनी सकाळी 9 वा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या उपक्रमाचे उद्घाटन केले.
विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयक फलक घेऊन परिसरात प्रभात फेरी काढून नागरिकांना माहितीपत्रक वाटण्यात आले. यावेळी स्वछतेविषयीचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमात आरोग्य निरीक्षक शरद मरकड, सुषमा मुंडे, संदेश रोडे, अजय थोरात, मुख्याध्यापक सतीश धुमाळ, एकनाथ चव्हाण, मंगेश बोराटे, अरुण फुंदे, संतोष अस्वले, संतोष गायकवाड, प्रयाग पठारे, सतीश ताम्हाणे, विनोद पठारे हे उपस्थित होते.