हरियाणा पोलिसांची मेहुणबारे हद्दीत कारवाई
चाळीसगाव – हरयाणा राज्यातून सुमारे एक कोटी 65 लाख रुपयांची बेकायदा दारू वाहतूक होत असताना हरियाणा पोलिसांनी मेहुणाबारे पोलिस स्टेशनच्या हद्दीत जप्त केली आहे काल सायंकाळी झालेल्या कारवाईने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे याबाबत माहिती अशी की हरियाणा राज्यातून एक कोटी 65 लाख रुपयांची दारूने भरलेले कंटेनर मालेगाव हून औरंगाबाद कडे जात असताना हरियाणा पोलिसांनी जप्त केले आहे ही बेकायदा दारू वाहतूक ज्या न्यायालयाच्या कक्षेतून केली जात असते त्या न्यायालयात आरोपींना हजर करावे लागते अशी कायद्यात तरतूद असल्याने हरियाणा पोलिसांनी पोलिस कस्टडी मागणीसाठी आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आल्याची चर्चेने दिवसभर उधाण आले होते अशा प्रकारची दारू जप्तीची कार्यवाही झाली असून नाशिक दारू बंदी उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला असल्याच्या वृत्ताला मेहूनबारे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दुजोरा दिल्याने कारवाई झाल्याबाबत अफवा खरी ठरली आहे.