मुंबई – माटुंगा परिसरात मिसिंग झालेल्या एका सहा वर्षांच्या मुलाला अवघ्या एका तासांत माटुंगा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले. अवघ्या एका तासांत मुलाला शोधून काढणार्या माटुंगा पोलिसांचे डॉक्टर पित्याकडून आभार मानण्यात आले. डॉ. प्रशांत देशमुख हे त्यांचा सहा वर्षांचा मुलगा राजदीपसोबत काल सायंकाळी माटुंगा येथे आले होते. माटुंगा मार्केटमध्ये फिरत असताना राजदीप हा अचानक मिसिंग झाला. योवेळी प्रशांत देशमुख यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही.
त्यामुळे भयभीत झालेल्या प्रशांत यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळू काकड यांची भेटघेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. या घटनेची बाळू काकड यांनी गंभीर दखल मुलाची सविस्तर माहिती घेऊन आपल्या पथकासह शोधमोहीम सुरु केली होती. मार्केट तसेच आसपासचा परिसरात पिंजून काढल्यानंतर राजदीप हा पोलिसांना महेश्वरी सर्कल परिसरात सापडला. पोलिसांच्या सतर्कमुळे अवघ्या एका तासांत राजदीपला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर त्याचा ताबा त्याच्या डॉक्टर वडिलांकडे सोपविण्यात आले होते. दुसर्या घटनेत गोरेगाव येथे मिसिंग असलेल्या पूजा रामानंद मिश्रा या मुलीला बांगूरनगर तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. 9 जुलैला पूजा ही गोरेगाव परिसरातून मिसिंग झाली होती. तिची मिसिंगची तक्रार गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत तिचा शोधून तिला तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे. तिसर्या घटनेत डी. एन. नगर पोलिसांनी एका तीन वर्षांच्या मुलाला त्याच्या पालकांकडे सोपविले. 8 जुलैला सागर सिटीजवळ मुस्तफा मोहम्मद सय्यद नावाचा एक तीन वर्षांचा मुलगा पोलिसांना सापडला होता. चौकशीनंतर तो मुलगा मिसिंग असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याच्या पालकांचा शोध घेऊन नंतर त्याला त्याची आई रेश्मा सय्यद हिच्या स्वाधीन करण्यात आले.