कासोदा । आर.पी.आय आठवले गटातर्फे विविध मागण्यासांठी एरंडोल तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले. नायब तहसिलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी, ए.पी.आ.केदारे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण कर्त्यांनी उपोषण सोडले. नागरिकांना अत्योंदय योजनेत समाविष्ट करण्यात यावे यासंह विविध मागणी केली आहे.
भगवान सोनवणे, मिलींद भोई, अनिल अडकमोल, दिलीप सपकाळे, गणेश मोरे आदींनी उपोषण स्थळी भेट दिली. प्रविण बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली देवानंद बेहेरे, सिताराम मराठे, औचित पवार, भैरुलाल पांडे, मजीद बेलदार, मन्सुरखा पठाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मागण्या मंजूर न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल यास प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा देण्यात आला आहे.