एक धागा अंधारातून चमकणार्‍या नात्याचा

0

पुणे । भाजपा चित्रपट कामगार आघाडीतर्फे गांधीभवन पुणे येथील मुलींच्या अंधशाळेत एक आगळा वेगळा कलाकार रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रिती व्हिक्टर, उपाध्यक्ष सुहास निबंधे, पुणे शहर उपाध्यक्ष अभिनेत्री भाग्यश्री देसाई, संतोष चोरडिया, सुनंदा काळुसकर, सचिव मंदार जोग, अभिनेत्री मुक्ता पटवर्धन, अभिनेत्री वृंदा बाळ, पिंपरी -चिंचवड उपाध्यक्ष केतन लुंकड, शैलेश पुसतकर, कैलास वाघ, मनोज थोरात व शाळेतील पदाधिकारी उपस्थित होते.

शाळेतील मुलींना रक्षाबंधनाच्या माध्यमातून त्यांच्या उज्वल भविष्याबद्दल विश्‍वास निर्माण करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील मुलींच्या स्वागतपर व बहीण भावांच्या नात्यावर आधारीत गीतांनी झाली. त्यानंतर एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांनी मनोरंजनपर कार्यक्रमातून मुलींची धमाल करमणूक केली. राखी पौर्णिमेचे औचित्य साधून प्रीती व्हिक्टर यांनी मुलींना आपल्या विचारातून जगण्याचा कानमंत्र दिला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सुनंदा काळुसकर, मंदार जोग, वृंदा बाळ आदिंनी केले तर सूत्रसंचलन वृंदा बाळ यांनी केले.