जळगाव: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीचा टीजर प्रदर्शित केला. यावेळी राऊत यांनी ‘एक शरद सगळे गारद’ अशा मथळ्याखाली टीझर प्रदर्शित केला. दरम्यान यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता एका व्हाट्सअप एसेमेसचा दाखला देत त्यांनी ‘एक नारद शिवसेना गारद’ अशा शब्दात शिवसेनेसह संजय राऊत यांना टोला लगावला.
संजय राऊत यांची एक मुलाखत घ्या आणि त्याला ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे नाव द्या अशा संदेश मला व्हाट्सअप आल्याचा चिमटाही फडणवीस यांनी काढला.