पिंपरी ः डॉ. बाबासाहेब आंबेडक जयंतीला सर्व स्तरातील तसेच सर्व जाती धर्माचे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनाला येताना मेणबत्ती व फुले घेऊन येतात. या मेणबत्ती व फुलांपेक्षा एक पेन, एक वही प्रत्येकाने आणावे. एकत्र करून हे पेन आणि वह्या गरजू मुलांना वाटण्यात येणार आहेत. त्यामुळे फुलांपेक्षा वही, पेन घेऊन यावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर वही पेन संकलन व वितरण समितीच्यावतीने करण्यात आले. संकलीत झालेल्या सर्व वह्या आणि पेन यांचे वाटप ग्रामीण भागातील गरजू शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी, कष्टकरी, शेतमजुरांच्या मुलांना करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींना या उपक्रमात सहयोग द्यायचा आहे अशा व्यक्तींनी 9850112538 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.