‘एक भूल; कमल का फूल’ : कांताताई पांढरे

0

यवत । व्यापार्‍यांनी निवडणूक काळात भाजपला डोक्यावर घेतले. आता हेच व्यापारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलने करतात. आणि आता म्हणतात आमची चूक झाली. हे भाजप सरकार गोरगरिबांचे नसून ते धनदांडग्यांचे आहे त्यामुळे ‘भाजपा म्हणजे एक भूल, कमल का फूल’ आहे असे जोषपूर्ण प्रतिक्रिया मुळशी तालुका काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षा कांताताई पांढरे यांनी केले. स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गुरुवारी रथयात्रा काढण्यात आली.काँग्रेसच्या काळात संजय गांधी निराधार योजनेतून निराधारांना 900 रुपये तर श्रावणबाळ योजनेतून 600 रुपये प्रति महिना मिळत असताना आताच्या भाजप सरकारने ते आता बंद केले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ‘तुमच्याच आया-बहिणींचे फोटो त्या बाटलीवर लावा,’ अशी विखारी टीका पांढरे यांनी केली.

काँग्रेस पक्ष हा गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा पक्ष असून हा अथांग सागर आहे. तो बुजणार नाही, विझणार नाही तो अमर असून पुन्हा सत्तेत आल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी दौंड तालुकाध्यक्ष पोपटभाई ताकवणे, महिलाध्यक्षा मालन दोरगे, अरविंद दोरगे, अशोक फरगडे, बाळासाहेब दळवी, विठ्ठल खराडे, बाळासाहेब दोरगे, मोहसीन तांबोळी, विठ्ठल दोरगे, रफिक शेख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सरकार शेतकर्‍यांच्या हिताचे नाही
तीन वर्षांपासून शेतकर्‍यांच्या पिकाला बाजारभाव नाही. शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करतो. हे भाजपा सरकार सहा महिन्यांपासून कर्जमाफी करतेय परंतु अद्यापपर्यंत एकाही शेतकर्‍यास कर्जमाफी झाल्याचे ऐकिवात नाही. या सरकारला सहकारी बँका, कारखाने, सहकारी संस्था बुडवायच्या आहेत. हे भाजप सरकार शेतकर्‍यांच्या हिताचे नाही.
– पोपटभाई ताकवणे,
दौंड काँग्रेस तालुकाध्यक्ष