‘एक राखी सैनिक भावासाठी’; युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचा उपक्रम

0

राख्या, पत्रे पाठविण्याचे आवाहन : सैनिकांपर्यंत पोहचविणार जळगावकरांच्या भावना
जळगाव – शहरात नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या युथ फॉर हेल्प फाऊंडेशनने ‘एक राखी माझ्या सैनिक भावासाठी’.. हा उपक्रम हाती घेतला आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सेवा बजावणार्‍या सैनिक भावांसाठी जिल्ह्यातील भगिनींनी राखी किंवा संदेशपर पत्रे युथ फॉर हेल्प फाऊंडेशनकडे पाठविण्याचे आवाहन चेतन वाणी यांनी केले आहे.

आपल्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर सैनिक बांधव 24 तास 365 दिवस डोळ्यात तेल घालून उभे असतात. सण कोणताही असो त्याचा आनंद न घेता ते आपली सेवा बजावित असतात. सिमेवर लढा देणार्‍या सैनिक भावांना जळगावकर भगिनींच्या प्रेमाचा ओलावा आणि आपुलकीचा संदेश असलेल्या प्रार्थना मिळाव्या यासाठी युथ फॉर हेल्प फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. गुरूवार 23 ऑगस्ट पर्यंत राख्या, शुभेच्छा पत्रे युथ फॉर हेल्प फाऊंडेशनच्या 1, पहिला माळा, कालिदास चेंबर, प्रताप नगर या पत्त्यावर किंवा रॉबीन लुल्ला – विजय इलेक्ट्रॉनिक्स, दु.क्र.4, 5 गोलाणी मार्केट, जळगाव, जकी अहमद – के लाँज, ग्राऊंड फ्लोअर, खान्देश सेंट्रल मॉल, जळगाव येथे पाठवाव्या असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्काचे आवाहन
जिल्ह्यातील भगिनींनी चेतन वाणी 9823333119, वसीम खान 9730000907, राकेश वाणी 9975493948, सनी भालेराव 9595111901 यांच्याशी संपर्क साधल्यास ते आपल्याकडून राख्या व शुभेच्छा पत्रे जमा करतील, असे कळविण्यात आले आहे.