अंधारातून शहरवासीयांची सुटका ; एक कोटी 77 लाख रुपयांचे वीज बिल थकले
मुक्ताईनगर- नगरपंचायतीकडे पथदिव्यांच्या वीज पुरवठ्यापोटी एक कोटी 77 लाख रुपयांचे वीज बिल बाकी असल्याने शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा सोमवारी रात्रीपासून खंडीत करण्यात आला होता. ऐन सणासुदीच्या काळात शहरात अंधार पसरल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता. मंगळवारी नगरपंचायतीने एक लाखांची थकबाकी भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.
नगरपंचायतीने केला एक लाखांचा भरणा
दिवाळीसारख्या सणासुदींचे दिवस असताना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरवासीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नगरपंचायत फंडात निधी उपलब्ध नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात एक लाख रुपयाचा धनादेश वीज वितरण कंपनीला मंगळवारी देण्यात आल्याचे मुख्याधिकारी श्याम गोसावी म्हणाले. सायंकाळी वीजपुरवठा पूर्ववत सुरू होईल, असेही ते म्हणाले.