यावल : तालुक्यातील शिरसाड येथील रहिवासी व हल्ली मुंबई पोलिस दलात नोकरीस असलेल्या 37 वर्षीय विवाहितेचा पतीने मूलबाळ होत नसल्याने तसेच जुनी चार चाकी घेण्यासाठी एक लाख रुपये न आणल्याने छळ केला. छळ असह्य झाल्याने या प्रकरणी यावल पोलिसात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळातील पतीविरोधात गुन्हा
शिरसाड, ता.यावल येथील हलिमा रोशन तडवी (37) मुंबई पोलिस दलात सेवारत असून मुंबईत कार्यरत आहे. त्यांचा विवाह 2019 मध्ये रोशन जहांगीर तडवी (फालक नगर, भुसावळ) यांच्याशी झाल्यानंतर लग्नाच्या दोन वर्षानंतर रोशन तडवी यांनी विवाहितेला मूलबाळ होत नाही तसेच जुनी चार चाकी घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये न आणल्याने छळ करण्यास सुरूवात केली. शारीरीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्यानंतर विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.