एक लिंगायत कोटी लिंगायतचा नारा घुमला

0

औरंगाबाद । स्वतंत्र धर्म संस्थेची मान्यता मिळवा म्हणून आता लिंगायत समाजाने उठाव केला असून ‘एक लिंगायत, कोटी लिंगायत’ चा नारा दिला आहे. रविवारी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे आयोजित लिंगायत धर्म महामोर्चा औरंगाबादच्या क्रांती चौकातून काढण्यात आला होता. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्यावा, या मागणीसाठी हा महामोर्चा होता. या मोर्चाला मराठा सेवा संघाने पाठिंबा दर्शवला.

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्याची मागमी
मौर्चात हजारोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले. ’मी लिंगायत..माझा धर्म लिंगायत’, ’एक लिंगायत कोटी लिंगायत’, ’भारत देशा जय बसवेशा’, ’लिंगायत धर्माला मान्यता मिळालीच पाहिजे’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि माते महादेवी बेंग लुरू यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाला सुरूवात झाली. महापौर नंदू घोडेले आमदार सुभाष झांबड क्रांती चौकात भेट देऊन मोर्चाला पाठिंबा दर्शवला.भाजप आमदार अतुल सावे, भागवत कराड, माजी महापौर बापू घडामोडे, बसवराज मंगरूळे यांनी भेट देऊन मोर्चाला पाठिंबा दर्शवला.