कळंबोली : आई मित्र मंडळ खांदा कॉलनी यांच्या वतीने एक वही… एक पेन अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत जमा झालेल्या 2000 वहया आणि 2000 पेन वाकड़ी येथील अन्नासाहेब सहस्त्र बुद्धे माध्यमिक शालेतील आदिवासी विद्यार्थांना नगरसेवक संजय भोपी व वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे सरचिटनिस मोतीलाल कोली यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमला मयूर शेलके, प्रेमा भोपी, मनीषा कोली,सनिका इंदुलकर तसेच आई मित्र मंडलाचे अध्यक्ष रोहित कोली, उपाध्यक्ष अभिषेक भोपी, कार्याध्यक्ष अनिकेत लाखे व खजिनदार विनायक कोली व आई मित्र मंडलाचे पदाधिकारी हजर होते.