एक व्यक्ती जरी पॉझिटिव्ह आली तर संपूर्ण कुटुंबाची चाचणी करा
श महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिले निर्देश
जळगाव – घरातील एक व्यक्ती जरी कोरोना पॉझिटिव्ह आढळली तर कुटुंबातील सर्वच व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात यावी असे निर्देश महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज कोरोना बाबद घेतलेल्या बैठकीत दिले.बुधवारी महापौर दालनात सायंकाळी कोरोना उपायोजानांबादाची बैठक घेण्यात आली होती.या बैठकीत शहरातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, प्रभाग अधिकारी इतर कर्मचारी उपस्थित होते.
गृह विलगीकरणाचे फोर्म देणे बंद करा.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होत असलेल्या मृत्यूचे एक मुख्य कारण म्हणजे कोरोना सारखा आजार नागरिक अंगावर काढतात. यामुळे शहरातील वयाने साठवर्षाहून अधिक असलेले नागरिक जर कोरोना पॉझिटिव्ह आले तर त्यांना गृह विलगीकरणामध्ये न ठेवता त्यांना ऍडमिट करून घेणे. जेणेकरून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार होतील आणि ते बरे होतील.अशी सूचना यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केली.
आम्ही तुमच्या पाठीशी
गृह विलगीकरणाबद्दल एका डॉक्टरांनी सांगितले की रुग्णांचे गृह विलगीकरण करण्यासाठी आमच्यावर खुपदा दबाव टाकला जातो. यावेळेस उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचं कर्तव्य बजावा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
अख्या कुटुंबाची तपासणी करा
एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्या-आल्या त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची सुद्धा टेस्ट करण्यात यावी. जास्तीत जास्त टेस्ट होतील आणि कोरोनावर अंकुश ठेवण्यात महापालिकेला यश मिळेल असे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले
लवकरात लवकर फवारणी व्हावी
शहरातील काही डॉक्टर आहेत जे होम आयसोलेशन चा फॉर्म भरून देत आहेत. त्यामुळे डॉक्टर्स वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी काही डॉक्टरांनी केली. यावेळी महापौरांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.याच बरोबर काही नागरिकांकडून तक्रार आली होती की ज्या घरात पॉझिटिव सापडला त्या घरात वेळेवर जनतुक रोधक फवारणी होत नाही. यामुळे लवकरात लवकर ही फवारणी केली गेली पाहिजे असे आदेश यावेळी महापौरांनी दिले