जुन्नर । जुन्नर येथील डॉक्टर एखंडे हॉस्पिटलमध्ये मोफत सर्वरोग शिबिराचे 5 व 6 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 700 जणांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन अनिलकाका जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. जुन्नर शहर व परिसरातील 700 पेक्षा अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरार्थीना आवश्यक ती औषधे मोफत देण्यात आली. ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया आवश्यक आहे, त्या रुग्णांवर सवलतीचा दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जुन्नर शहर व परिसरातील लोकांना शहरात ज्या वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या शहरात जावे लागते, त्या सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती डॉक्टर अरविंद एखंडे यांनी दिली.या शिबिरात डॉ. गौरव पाटील, डॉ. देवेंद्र एखंडेज, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्नेहा एखंडे यांनी तपासणी केली. यापुढे हॉस्पिटलच्या माध्यमातून अशीच मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्याचा मानस असल्याचे डॉ. एखंडे यांनी सांगितले.