एखादा इच्छुक पदाधिकारी मुलाखातीला गेला नाही म्हणजे तो पक्षासोबत नाही, असे नाही…!

0

भोसरीत राष्ट्रवादीचाच आमदार निवडून येणार

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा विश्‍वास

पिंपरी : देशातील लाटेच्या विरोधात जाऊन शिरुर लोकसभेचा वेगळा निकाल लागला आहे. मागील निवडणुकीपेक्षा भोसरीतून विरोधकांचे 50 हजारांनी मताधिक्य कमी केले आहे. त्यामुळे कोणाला काहीही शंका असेल. परंतु, मला खात्री आहे, भोसरीचा आमदार राष्ट्रवादीचाच होणार, असा विश्‍वास शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्‍नांसंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी ते आले होते. त्यानंतर खासदार कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

शहरात कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर…
शहराच्या कचरा प्रश्‍नांवर आयुक्तांना समाधानकारण उत्तर देता आले नाही. त्यांनी कच-यांची निविदा ठेकेदारांना पोसण्यासाठी काढली आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती मागितली आहे. स्मार्ट सिटी कंपनीचा एसव्हीपी स्थापनेनंतर सल्लागार पुन्हा घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेची भूमिका सभागृहात मांडल्याने भोसरी रुग्णालय खासगीकरण थांबले आहे. जनतेसाठी ते खुलं होवून आरोग्य सुविधा चांगल्या देण्यात याव्यात, अशा सुचना केल्या आहेत. स्वाईन फ्लू, कचर्‍यामुळे रोगराई पसरु नये, याबाबत योग्य ती दक्षता घेण्याचे सांगितले आहे. रेडझोन असलेल्या भागात सोयी सुविधा बंद होणार नाहीत. त्यात नव्याने होणार्‍या बांधकामांना सोयी-सुविधा देणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

आळंदीत पिण्याचे पाणी प्रदुषित…

पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प नमामि चंद्रभागा प्रकल्पात समाविष्ट केल्याचे समजले आहे. त्या प्रकल्पांची सविस्तर माहिती घेवून नदी सुधार प्रकल्पांसाठी प्रयत्न करण्यात येईल, तसेच इंद्रायणी नदीतील जलप्रदुषणामुळे आळंदी पिण्याचे प्रदुषित झाले आहे. त्या नदीतील मासे हे मृत पावत आहेत. नदी सुधार प्रकल्प राबविणे काळाची गरज असून नद्या स्वच्छ करणे आवश्यक आहेत, असेही कोल्हे यांनी सांगितले.