मुंबई: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून हे सरकार पाच वर्ष टिकणार नाही असे वारंवार बोलले जात आहे. भाजपचे नेते वारंवार हे सरकार टिकणार नसल्याचा उल्लेख करतात. माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी देखील हे सरकार टिकणार नाही असे वारंवार सांगत आहेत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यात त्यांनी पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन होईल असे संकेत दिले आहे. मागील आठवड्यात सभागृहात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा परत फिरण्याचे आवाहन केले होते. दरम्यान आज गुरुवारी पुन्हा त्यांनी सभागृहात महाविकास आघाडी सरकार टिकणार नसल्याचे संकेत दिले आहे. मध्य प्रदेशप्रमाणे राज्यातही राजकीय उलथापालथ होणार असून महाराष्ट्रातही ज्योतिरादित्य सिंधिया येणार असल्याचे विधान सुधीर मुंनगंटीवार यांनी केले आहे.
आम्ही सरकार पडण्यासाठी प्रयत्न करणार नाही, मात्र सरकार त्यांच्याच कर्माने पडणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे. शंभर दिवसात शंभर अपराध केल्यानेच महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे सुधीर मुंनगंटीवार यांनी सांगितले आहे.