एचए स्कूलमध्ये नाताळ सण साजरा

0

पिंपरी : हिंदुस्थान अँटीबायोटिक्सच्या प्राथमिक व माध्यामिक शाळेत आज नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी रंगीत कपड्यांमध्ये डोक्यावर सांताक्लॉजच्या टोप्या घालून आले होते. इयत्ता 4 थी व 1 लीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण ख्रिस्त जन्म सोहळ्याचे नाट्यीकरण करून दाखवले. मुख्याध्यापिका सौ. कल्पना आगवणे यांनी मनोगतात येशू ख्रिस्ताच्या शिकवणी प्रमाणे आपणही विश्‍वशांतीसाठी प्रयत्न करावेत व एकमेकांशी आपुलकीने व प्रेमाने वागावे असा संदेश दिला. सूत्रसंचालन अर्चना गोरे यांनी केले. पाटकर यांनी माहिती सांगितली. लोखंडे यांनी गाणी गायली. वरिष्ठ शिक्षिका सुरेखा जाधव यांनी प्रार्थना म्हटली. सविता पॉल यांनी मार्गदर्शन केले.