पिंपरी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर अनेक शालेय उपक्रम राबवले जातात, पण विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा जागृत करणे आणि त्यांना कृतीयुक्त आनंद मिळावा या उद्देशाने हीरक महोत्सवी वर्षानिमित्त व बालदिनाचे औचित्य साधून बाल आनंद मेळाव्याचे आयोजन एच. ए.विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहीती मुख्याध्यापिका कल्पना आगवणे यांनी दिली आहे. बुधवारी (दि. 15) सकाळी साडेआठ ते 11 या वेळेत केले आहे. परिसरातील व्यावसायिक या निमित्ताने विविध प्रात्याक्षिके सादर करणार आहेत.