चाकण: महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स व यश फाऊंडेशनतर्फे संपूर्ण खेड तालुक्यामध्ये एच.आय.व्ही/एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रम राबवित आहे. या अंतर्गत एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्या व्यक्ती व बालकांसाठी नेहमीच विवध उपक्रम राबविले जातात. त्यांना आनंद देण्याचा तसेच सन्मान देण्याचा सोबतच त्यांचातील इच्छा पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातो. यश फाऊंडेशन व महिंद्रातर्फे या मुलांसाठी भाम नदीजवळील बागेत दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महिंद्रा कंपनीचे सनी लोपेझ,
यश फाऊंडेशनचे रवींद्र पाटील, कार्यक्रम अधिकारी वैभव पवार, पराग पाटील, मनीषा परदेशी, नलिनी चव्हाण आदी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी या मुलांसोबत दहीहंडी साजरी केली. यांनतर मुलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
हे देखील वाचा
यानंतर मनोरंजन कार्यक्रमात बालगोपालांनी महिंद्रा व यश फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांसोबत मनसोक्त नृत्य केले. या कार्यक्रमात सुमारे 150 मुले व पालकांनी सहभाग नोंदविला. इतरांप्रमाणे या मुलांनाही सर्व सण, उत्सव साजरे करण्याचा आणि आनंदाने जगण्याचा अधिकार आहे, अशा भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केल्या. तर बालकांनी दहीहंडीचा आनंद लुटला. यावेळी सर्वांनी आपले दु:ख विसरुन बालगोपालांनी एकत्रित येवून दहीहंडी फोडली.