एच.आय.व्ही.ग्रस्त महिलांसाठी मेळावा

0

चाकण – महिंद्रा व्हेईकॅल व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एच.आय.व्ही ग्रस्त महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एस.आय.व्ही.सह जीवन जगणार्‍या महिलांना देखील एक स्त्री म्हणून स्वतःच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून, नवीन उमेदीने त्यांनी आयुष्याकडे पहावे व जिद्दीने आनंदी जीवन जगण्यासाठी वाटचाल करावी या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिंद्रा कंपनीचे सनी लोपेज, संतोष उनवणे, सयाजी देसाई, निलेश नाईकवाडी व यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, क ार्यक्रम अधिकारी वैभव पवार, विशाल सैंदाणे, ललिता तुपे आणि मनीषा परदेशी उपस्थित होते. यामध्ये150 हु अधिक महिलांनी सहभाग नोंदविला.

सनी लोपेज मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महिलांनी आपल्या आयुष्यात येणार्‍या अडचणींवर मात करून यशाकडे यशस्वीपणे वाटचाल करावी. आपले आरोग्य नीट जपून आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. रवींद्र पाटील म्हणाले की, या महिलांना इतर महिलाप्रमाणे जीवन जगता आले पाहिजे. त्यांनी ही वेळोवेळी विविध कार्यक्रमात भाग घेता यावा आणि आपला विकास साधावा या करिता विविध पुनर्वसन कार्यक्रमातून यश फाउंडेशन ट्रेनिंग देत राहील. यावेळी या महिलांच्या बचत गटाची स्थापना करण्यात आली. महिलांचे सक्षमीकरण करून त्यांनी बचत करून त्यांनी त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांना या बचतीतून आर्थिक मदत व्हावी व स्वतःचा लघु उद्योग सुरु करून स्वावलंबी व्हावे या उदेशाला साध्य करण्यासाठी सदर बचत गटाची स्थापना करण्यात आली.

महिला दिना निमित्त शिरोली गावात या महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात अनेक मनोरंजनात्मक खेळ खेळण्यात आले. संगीत खुर्ची, लिंबू चमचा, रिंग बाटली इत्यादी खेळ घेण्यात आले. ज्या महिला विजयी ठरल्या त्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.