एच. आर. पटेल फार्मसीत व्यक्तिमत्व विकासावर दोन दिवशीय कार्यशाळा

0

शिरपूर । येथील दि शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित एच. आर. पटेल औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जुनूनहा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. उद्घाटन जळगाव येथील स्क्वेअर सर्कलचे संचालक सतीश मंडोला यांच्या हस्ते एस. एम. पटेल सभागृहात झाले. यावेळी उपप्राचार्या डॉ. सविता पाटील, कार्यशाळेचे समन्वयक डॉ.एल.आर.झवर व इतर मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. सविता पाटील ह्या होत्या. सतीश मंडोला यांनी मार्गदर्शन केले.

पदवी, पदव्युत्तर शाखेतील 225 विद्यार्थ्यांचा सहभाग
या कार्यशाळेत महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर शाखेतील सुमारे 225 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमांतर्गत सतीश मंडोला यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, समय सूचकता, घ्येय ठरविणे, सकारत्मक दृष्टीकोन, मेंदूची कार्यप्रणाली इत्यादींबाबत सखोल मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन केल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्षव उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक ड़ॉ. के. बी. पाटील, प्राचार्य ड़ॉ. एस. बी. बारी व उपप्राचार्या डॉ. एस. डी.पाटील यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन प्रा. पायल पाटील यांनी व आभार डॉ. एल. आर. झवर यांनी मानले.