एच.ए. स्कूलच्या कब-बुलबुलने पटकावला ‘सुवर्णबाण’ पुरस्कार

0

पिंपरी-चिंचवड : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेद्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलमधील (प्राथमिक विभाग) कब व बुलबुल यांनी स्काऊट-गाईड क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘सुवर्णबाण’ पुरस्कार पटकावला आहे. या स्कूलमधील पाच कब यांनी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट-गाईडस् यांच्यातर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय ‘चतुर्थ चरण’ ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णबाण या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यासाठी कब मास्टर रफेल जॉन स्वामी यांनी मार्गदर्शन केले.

10 बुलबुल यांचेही उल्लेखनीय यश
याच शाळेतील 10 बुलबुल यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट व गाईडतर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय ‘हिरकपंख’ ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे त्या राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णबाण या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. यासाठी फ्लॉक लीडर सविता पॉल यांनी मार्गदर्शन केले. अर्चना गोरे यांनी त्यांना सहाय्य केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळाप्रमुख सुलभा भुजबळ यांच्यासह संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, शिक्षकवर्गाने कौतूक केले.