एच. ए. स्कूलमध्ये क्रांतीदिन साजरा

0

पिंपरी-चिंचवड : येथील एच. ए. स्कूलच्या प्राथमिक विभागात क्रांतीदिन, संस्थापक दिन व आदिवासी दिन साजरा करण्यात आला. क्रांतीदिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका कल्पना आगवणे, ज्येष्ठ शिक्षिका साळुंके, जाधव, भामरे, हेब्बाळकर, निवंगुणे, इसवे, येनगुल आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमात महापुरुषांना अभिवादन
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका कल्पना आगवणे यांच्या हस्ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळुणकर, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन आपटे तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रथम अध्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भामरे व हांगे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीदिनाची माहिती दिली. आदिवासी दिनानिमित्त भिलोरी आदिवासी बोली भाषेत ‘ढोंड ढोंड पाणी दे…’ हे गाणे म्हणण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.