पिंपरी : हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात 61 बाटल्या रक्त संकलीत झाले. शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या या उपक्रमादरम्यान रक्तदान विषयावर व्याख्यान, विविध स्पर्धा व मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना आगवणे, शिक्षक चौधरी, बाबार, शिक्षिका येनगुल, कडू, शिक्षकेतर कर्मचारी गेजगे यांनी रक्तदान केले. शिबिरामध्ये 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले.