वॉशिंग्टन। अमेरिकेत पीएच.डी. करण्यासाठी येणार्या परदेशी विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या व्हिसामध्ये एच वन बी व्हिसाच्या अटींमध्ये सवलत देण्यासंदर्भातले एक विधेयक अमेरिकेच्या संसदेत पुन्हा मांडण्यात आले आहे. अमेरिकेत विद्यान, तंत्राद्यान, अभियांत्रिकी आणि गणित विषयात अमेरिकेत पीएच.डी. करण्यार्या परदेशी विद्यार्थ्यांना रोजगारासाठी ग्रीन कार्ड किंवा एच वन बी व्हिसाच्या अटी लागू करण्यात येऊ नयेत, असे या विधेयकात म्हटले आहे. हा व्हिसा वार्षिक पद्धतीने देण्यात येतो. खासदार एरिक पॉलसन आणि माईक क्विगले यांनी द स्टँपिंग ट्रेंड इन अमेरिका पीएच.डी. फ्रॉम लीविंग द इकॉनमी (स्टॅपल) विधेयक हाऊस ऑफ रिप्रेझेंटिव्हमध्ये सादर केले आहे. अमेरिकेत पीएच.डी. करणार्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या विधेयकचा भारतीय विद्यार्थ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. अमेरिकेत कौशल्यावर आधारीत अनेक उच्चपदे रिकामी आहेत. या विधेयकाच्या माध्यमातून अमेरिकेतील कंपन्याना त्यांच्या आवश्यकतेनुसार कौशल्यावर आधारीत मनुष्यबळ उपलब्ध व्हावेत, असे स्टॅपल अॅक्टमध्ये निश्चित करण्यात आले आहे.
अर्थव्यवस्थेत योगदान
अमेरिकेच्या संसदेत हे विधेयक पुन्हा मांडण्यासाठी पुढाकार घेणारे खासदार एरिक पॉलसन म्हणाले की, उच्च शिक्षणासाठी जगभरातील प्रतिभावंत विद्यार्थी अमेरिकेत येत असतात. त्यात नाविन्य नाही. ज्या विद्यार्थ्यांना शिकवून घडवतो, त्यांचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी उपयोग व्हायला पाहिजे. या विद्यार्थ्यांच्या पदवी, पदविकांच्या जोडीने ग्रीन कार्ड किंवा एच वन बी व्हिसा जोडला गेल्यास हे विद्यार्थी नवनवीन प्रयोग करून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देतील.
पुढे जाणार नाही
अमेरिकेत उच्चशिक्षण घेणार्या परदेशी विद्यार्थ्यांना असेच हाकलत राहिलो तर अमेरिकेत तंत्रविकास, संशोधनला पुढावा मिळणार नाही. अमेरिकेला संशोधन, अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल आणि जागतिक बाजारपेठेत एक प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून रहायचे असेल तर जगभरातील विद्यार्थ्यांना येथे शिकण्याची, काम करण्याची, इथल्या समाजात मिसळण्याची परवानगी द्यावी लागेल, असे खासदार माईक क्विगले म्हणाले.