एच वॉर्ड पालिकेची धडक कारवाई

0

मुंबई । सांताक्रूज पूर्व नेहरू रोड येथील फुटपाथवरील दुकानावर एच वार्ड पालिकेकडून 23 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता धडक कारवाई करण्यात आली. पालिकेकडून फेरीवाले व दुकानदारांना काही मीटर व फुटपाथ यांची सीमा रेषा आखून देऊनसुद्धा फेरीवाले आपली सीमा सोडायला तयार नसल्याने महानगरपालिकेला अशा फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करावी लागत आहे.

एच वॉर्डच्या सहायक आयुक्त अलका दुसाने यांनी सांताक्रूज पूर्व येथील नेहरू रोडवर फुटपाथ व्यापून बसलेल्या आणि दुकानदारांनी वाढवलेल्या जागेवर धडक कारवाई करून 50 दुकानदार व फेरीवाले यांच्यावर कारवाई करून संपूर्ण माल पालिकेने जप्त केला. या कारवाईदरम्यान पालिकेला पोलीस संरक्षण घ्यावे लागले. फेरीवाल्यांचा संपूर्ण माल जप्त करण्यासाठी पालिकेला 5 गाड्या कारवाईसाठी आणाव्या लागल्या.