एच 1 बी व्हिसा धोरणात बदल नाही

0

अमेरिकाचा लाखो भारतीयांना दिलासा

वॉशिंग्टन : एच 1 बी व्हिसा मुदतवाढीच्या धोरणात बदल होणार नाही; अमेरिकाचा दिलासा अमेरिकी काँग्रेसच्या काही सदस्यांनी एच 1 बी व्हिसा धारकांच्या मुदतवाढीस नकार दिल्यानंतर आता अमेरिकी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एच 1 बी व्हिसा धारकांना मायदेशी परत पाठवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही
एच 1 बी व्हिसा धारकांसाठी ट्रम्प प्रशासन नवीन धोरण आणत असून यामुळे अमेरिकेतील सुमारे साडे सात लाख भारतीयांना मायदेशी परतावे लागणार होते. एच 1 बी व्हिसाच्या मुदवाढीसंदर्भात या धोरणात समावेश होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रशासनाने मंगळवारी स्पष्टीकरण दिले. एच 1 बी व्हिसा धारकांना मायदेशी परत पाठवणारा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. भविष्यात एच 1 बी व्हिसा धोरणात बदल झाले तरी त्यामुळे व्हिसा धारकांना अमेरिका सोडावे लागणार नाही, असे सांगत प्रशासनाने व्हिसा धारकांना दिलासा दिला आहे.