भामट्याने हातचलाखीने बदलले कार्ड
वरणगाव । वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीतील एटीएममधून 75 हजार 700 रुपये लांबविण्याचा प्रकार शुक्रवार, 1 रोजी उघडकीस आल्याने अज्ञात चोरट्याविरुध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्रात आला. भामट्याने एटीएम कार्ड बदलल्याने ही घटना घडली.
अनोळखी तरुणाची हुशारी
सचिन पांडूरंग निमजे (वर 26, राहणार टिळक रोड, मोहाळी जिल्हा भंडारा हल्ली मुक्काम वरणगाव) आयुध निर्माणी वरणगाव कारखान्यात नोकरीला आहे. ते 26 रोजी शहरातील टाटा इंडिकॅश एटीएममध्ये सायंकाळी पैसे काढत असतांना पैसे निघत नव्हते. त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या अनोळखी तरुणाने पैसे काढून देतो, असे सांगत विश्वास संपादन करून एटीएम कार्ड लांबवले. याच दिवशी वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीमधील स्टेट बॅक शाखेतून या चोरट्याने सचिन निमजे यांच्या एटीएममधून 75 हजार 700 रुपरे लांबविल्याचा प्रकार 31 रोजी उघडकीस आल्याने सचिन निमजे यांनी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध फिर्राद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वाणी करीत आहे.