एटीएममध्ये भरणा करताना घातला गंडा

0

कल्याण । एटीएममध्ये भरण्यासाठी देण्यात आलेल्या तब्बल 49 लाख 50 हजार रुपये घेऊन पसार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत रोकड लंपास करणार्‍या रोशन पाटीलला अटक केली आहे. ऐरोली येथील ब्रिक्स कंपनी ही बँकांच्या एटीएमध्ये कॅश भरणा करण्याचे काम करते.

मानपाडा पोलिसांनी केली आरोपीला अटक
या कंपनीत तक्रारदार किरण हडकर हे कॅशियर म्हणून काम करतात. याच कंपनीत रोशन पाटील हा देखील कॅशियर म्हणून काम करत होता. हडकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाटील याला एटीएममध्ये पैसे भरण्याकरिता दिले होते. मात्र 19 ऑगस्ट रोजी त्यांना हे पैसे पाटील याने भरणा न करता त्या पैशांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी तक्रारदार किरण हडकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पाटील यांचा शोध सुरु केला होता. अखेर पोलिसांनी पाटीलला अटक केली आहे. ऐरोली येथील ब्रिक्स कंपनीत रोशन पाटील हा कॅशियरचे काम असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.