चिंचवड : एटीएम कार्डचा गैरवापार करत अज्ञात इसमाने एका निवृत्त शिक्षकाची दिड लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना 12 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत झाली आहे. भानुदास नाथा खुडे (वय 58, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खुडे हे निवृत्त शिक्षक आहेत. त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड त्यांच्याच ताब्यात असताना कोणीतरी अज्ञात इसमाने तांत्रीक छेडछाड करत त्यांच्या खात्यातील तब्ब्ल एक लाख 60 हजार रुपयांची रक्कम 24 तासांच्या आत परस्पर काढून घेतली आहे. खात्यातील पैस परस्पर काढून घेतले जात असल्याची समजताच खुडे यांनी पोलिसात धाव घेतली. याचा पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण करीत आहेत.