जळगाव। एटीएम मशिनमध्ये पैसे काढुन देतो, असे सांगून हातचालाखीने एटीएएम कार्ड बदलवुन एका अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्याला 13 हजार 100 रुपयांमध्ये गंडविल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंप परिसरात अॅक्सिस बँकेच्या एटीएम मशिनजवळ घडली आहे. याबात अद्याप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. शहरातील गुजराल पेट्रोल पंप परिसरात वासुदेव चौधरी हे कुटूंबियांसोबत राहतात. तर ते जैन इरिगेशन येथे कामाला आहेत. त्यांचा मुलगा हितेश चौधरी हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे हितेश चौधरी याचेकडे एटीएम कार्ड होते.
पाचशे रुपये काढण्यासाठी आला युवक
हे एटीएम कार्ड घेवून हितेश गुजरात पेट्रोल पंपाजवळील अॅक्सिस बॅकेच्या एटीएमजवळ गेला. याठिकाणी आधी पैसे चेक करण्यासाठी त्याने प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. याचवेळी त्याच्यजवळ एक तरुण उभा होता. त्याने पैसे काढायचे आहे का? अशी विचारणा हितेशला केली. यावर त्याने हो सांगितल्याने हितेशचे एटीएम कार्ड त्या तरुणाने घेतले. यानंतर हितेशने 500 रुपये काढले. यावेळी हातचालाखीने त्या तरुणाने हितेशला बनावट एटीएम कार्ड परत दिले.
पैसे काढल्याची वडीलांना दिली माहिती
तरूणान पैसे काढून दिल्यानंतर हातचालाकीने एटीएम कार्ड बदलून तरूणाने हितेशला दुसरेच एटीएम कार्ड दिले. यातच हितेश घरी जात नाही तोच त्याच्या मोबाईलवर आधी 10 हजार त्यानंतर 3 हजार नंतर 100 रुपये काढल्याचे एसएमएस आले. आपले एटीएम आपल्याजवळ असतांना पैसे कसे निघाले. या शंकेने हितेश ने वडिल वासुदेव चौधरी यांना फोन केला. कंपनीन कामाला गेलेले वासुदेव चौधरी हातचे काम सोडून घरी परतले. यानंतर दोघं पिता-पुत्र सेंट्रल बँकच्या शाखेत गेले. बँक अधिकार्यांशी विचारपूस केल्यानंतर अधिकार्यांनी पोलीसांत जाण्याचे सांगितले.
पोलिस स्टेशन गाठले
काही वेळानंतर हितेश व वासुदेव चौधरी यांनी बँक अधिकार्यांच्या सांगण्यानुसार शहर पोलीस ठाणे गाठले. हद्दीचे कारण पुढे करीत पिता-पुत्रांना पोलीसांनी रामानंदनगर पोलीसांकडे पाठविले. रामानंदनगर पोलीसांनीही हद्दीचे कारण सांगून जिल्हापेठला दोघांना पाठविले.
जिल्हापेठ पोलीसांनी त्यांच्याकडून घडलेल्या प्रकाराची माहिती जाणुन घेतली. बँकेमधील खातेउतारा आणल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगून जिल्हापेठ पोलीसांनीही हितेश व वासुदेव चौधरी यांना परत पाठविले. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.